पॅलेस्टिनी कवयित्री रफीफ झिआद : “हद्दपारीचे जीवन जगताना बरेच जण त्यांना ठाऊक असलेल्या भूमीला मुकतात. पण आम्ही ठाऊक नसलेल्या भूमीला मुकलो...”
आधुनिक पॅलेस्टिनी कवितेचा विकास हा पॅलेस्टिन व इस्रायलच्या संघषार्शी निगडित आहे. तीव्र उपरोध, आपल्या अस्तित्वाचा शोध आणि स्वत:ची ओळख हा आधुनिक पॅलेस्टिनी साहित्याचा अंगभूत विशेष आहे. इस्रायलने प्रदेश व्यापणे, तो गमावणे आणि जबरदस्तीने लादलेली हद्दपारी यांनी केलेला प्रतिकार, स्वदेशप्रेम, मायभूमीची ओढ यांचा आविष्कार पॅलेस्टिनी कवितेत झाला आहे.......